मुंबई | अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत. करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या.
करीना आणि अमृता या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्या सर्वांचे आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून करिनाने तिच्या संपर्कात आलेल्यांना विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे.
करिनाने पोस्टमध्ये लिहीले, ‘मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी सर्व मेडिकल प्रोटोकॉल्स फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी ही विनंती. माझ्या कुटुंबाने आणि स्टाफने लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षण दिसत नाहियेत. माझी प्रकृती सध्या ठिक आहे. ‘