सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. आज वाढत्या रुग्णसंख्यामुळे वैद्यकीय उपकरणे सुद्धा तोकडी पडू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी आज कोरोनाच्या संकटात मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र अंबरनाथमध्ये एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
अंबरनाथमध्ये मोहन कुलकर्णी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या रिटायरमेंटच्या पैशातून अंबरनाथ नगरपालिकेला एक व्हेंटिलेटर घेऊन दिल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथ पालिकेत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी सोहळ्यात हा व्हेंटिलेटर नगरपालिकेला प्रदान करण्यात आला. मोहन कुलकर्णी हे बोरॅक्स मोरारजी कंपनीत त्यांनी तब्बल ४० वर्ष नोकरीला होते. 2003 साली कुलकर्णी हे निवृत्त झाले आणि त्यानंतर मुंबईला वास्तव्याला गेले.
त्यातच काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर कुलकर्णी यांना आरोग्य सेवेसाठी काहीतरी योगदान देण्याची मनापासून इच्छा होती. त्यातच सध्याची आणीबाणीची परिस्थिती पाहता कुलकर्णी यांच्याकडे जमा असलेल्या पुंजीतून अंबरनाथ पालिकेला एखादी रुग्णवाहिका घेऊन द्यावी, असा विचार त्यांच्या मनात आला. पण रुग्णवाहिकेची गरज नसून व्हेंटिलेटर देता आले तर बघा. मात्र इतके पाहसी जवळ नसल्यामुळे बँकेतील १.५० लाखाचे कर्ज काढून त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेला एक नवाकोरा व्हेंटिलेटर घेऊन प्रदान केला.