शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट बसलेले दिसून येत आहे अशातच शिंदे यांनी थेट भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदी विराजमान झाले तर दुसरीकडे महाविकास आघडी सरकार अल्पमतात येऊन कोसळले होते अशातच राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोच्या फेऱ्या झाडायला सुरवात केल्या होत्या.
मात्र तत्पूर्वी शिंदे गटाने वरळी मतदारसंघात एन्ट्री घेतली आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स झळकले आहेत. वरळीचा लाडका मार्केटचा राजा इथं श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे पोस्टर लावण्यात आले आहेत. या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो आहेत त्यामुळे आता वरळीत शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. याठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. स्थानिक आमदार आदित्यच्या मतदारसंघात शिवसेनेचे विधान परिषदेचे २ आमदार आहेत. त्यात सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा समावेश आहे. त्याचसोबत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील याच मतदारसंघात वास्तव्य करतात. राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतरही वरळीतील कुणीही पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले नव्हते. परंतु गणेशोत्सवात वरळीतील गणेश मंडपात एकनाथ शिंदेंचे बॅनर्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.