आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला शिंदे गट देणार उत्तर, पूर्वेश प्रताप सरनाईक उतरणार मैदानात

 

आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहे. शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे राज्यात दौरे करत आहे. आता आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव पुर्वेश सरनाई दौरे करणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुंबईसह राज्यभरात दौऱ्यावर आहे. ठिकठिकाणी जाऊन आदित्य ठाकरे हे संवाद साधत आहे आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत आहे. आता आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला शिंदे गट उत्तर देणार आहे.

शिंदेगटात सहभागी झालेले पुर्वेश सरनाईक युवासेनेतील तरुण शिवसैनिकांसाठी महाराष्ट्र दौरा करणार आहे. आजच पुर्वेश सरनाईक आणि किरण साळी यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी पुर्वेश सरनाईक आणि किरण साळी महाराष्ट्राभर दौरे करणार आहे. आदित्य ठाकरे विविध विभागांमध्ये जाऊन शक्तीप्रदर्शन करत आहे. याला शिंदे गटाकडूनही तसेच उत्तर दिले जाणार आहे. त्यामुळे आता राज्यात दौऱ्यातून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा संवाद यात्रा गेली मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून! दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर येथे आज आदित्य ठाकरे यांनी दौरा केला असून या दौऱ्याकरता आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थाना समोरुन जात असताना त्यांचे तेथे शिवसैनिकांनी स्वागत केले. आदित्य ठाकरे आता भिवंडी येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून तिथून पुढे ते शहापूर, इगतपुरी आणि नाशिक असा त्यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.

मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच; शिंदें सरकारने बंदी उठवली

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांची घेतली भेट

Team Global News Marathi: