कोंबडी रस्सावर अमित ठाकरेंसोबत कार्यकर्त्यांना मारला ताव

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या पालघर दौऱ्यावर आहे. यावेळी अमित ठाकरे यांनी दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी कोंबडी रस्यावर ताव मारला. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या पालघर ठाणे जिल्ह्यांच्या सात दिवसीय दौऱ्यावर आहेत.

बुधवारी बोईसर आणिडहाणू येथे त्यांनी शेकडो महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्याशी तसंच पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर दुपारी डहाणू तालुक्यातील नरपड मांगेला समाज वाडीतल्या सचिन हरिश्चंद्र तांडेल या दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी भेट दिली. यावेळी तांडेल यांनी अमित ठाकरे यांना जेवणाचा आग्रह केला. तांडेल कुटुंबीयांचा मान राखत अमित ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

तांडेल कुटुंबीयांनी खास कोंबडी आणि रस्स्याचा बेत आखला होता. मग, अमित ठाकरेंसोबत कार्यकर्त्यांनी कोंबडी रस्यावर आडवा हात मारला. यावेळी अमित ठाकरे यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावणाऱ्या सचिन हरिश्चंद्र तांडेल यांच्यासोबत कबड्डीबाबत सविस्तर चर्चा केली आणि त्यांना मिळालेली सर्व पारितोषिकं बघून कौतुक केले.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला शिंदे गट देणार उत्तर, पूर्वेश प्रताप सरनाईक उतरणार मैदानात

मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच; शिंदें सरकारने बंदी उठवली

Team Global News Marathi: