आदित्य ठाकरेंचा शिवसेनेशी संबंध काय? प्रतापराव जाधव यांचा प्रश्न

 

मुंबई | शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेशी संबंध काय? एखादी शिवसेनेची शाखा तरी स्थापन केली आहे का? आंदोलन करताना एखादा गुन्हा किंवा पोलीस केस आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आहे का? असे त्यांनी विचारले. पाटील यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ जारी केला आहे.

“माझ्यासारख्या व्यक्तीने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ३६ वर्षे काम केले. या महाराष्ट्रात आम्ही शिवसेना वाढविली. घराघरापर्यंत बाळासाहेबांचे विचार नेले. गावागावापर्यंत शाखा नेल्या. गाव तेथे शाखा असा उपक्रम राबविला. घर तेथे शिवसैनिक हा बाळासाहेबांचा नारा दिला.उपाशी-तापाशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांने ग्रामीण भागात काम केले.

पुडेबोलताना पाटील म्हणाले की, आदित्यचे वय ३२-३३ वर्षे आणि आमचे शिवसेनेतील कर्तृत्व ३६-३७ वर्षे आहे. आमच्यासोबत बोलताना त्यानी वयाचे भान ठेवले नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबातील आदित्यला पुढे आणले. आदित्यला निवडून देण्यासाठी दोनजणांना विधान परिषदेचे आमदार करावे लागले. आदित्य ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीतून निवडून आल्यामुळे त्यांचा राजीनामा द्यावा. मग, लोकांना सांगत फिरावे.” असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: