आदित्य ठाकरे यांची पुन्हा मुख्यमंत्र्यांवर टीका म्हणाले की,”गद्दारीचा डाव शिंदे यांनी.”

 

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर उद्धव ठाकरेंना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह देखील गमवावे लागले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. मात्र दीड वर्षांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी गद्दारीचा डाव आखला होता असा गौप्यस्फोट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिंदेच्या बंडाबाबत कल्पना असल्याचे सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? असं आम्ही तेव्हाच त्यांना विचारलं असल्याचंही आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे हे स्व:त एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होते, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एका मुलखातीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या फुटीबाबत भाष्य केलं. यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या ठाकरे आणि शिंदे गट अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमने सामने आले होते परंतु ही जागा भाजपाकडे गेली आणि त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय जाहीर केला.

Team Global News Marathi: