आदित्य ठाकरे तुम्ही दोन दिवसांत राजीनामा द्या, मी पण लगेच देतो – अब्दुल सत्तार

 

तिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना `तुम दारू पिते क्या? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर विरोधकांना आयते कोलीत मिळाले. विरोधकांनी आता तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. ही मागणी करण्यात युवासेनेचे अध्यक्ष आमदार आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आघाडीवर होते.

अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यायाला पाहिजे, पण मुख्यमंत्र्यांना ते जमणार आहे का? असा सवाल करत त्यांनी निशाणा साधला होता. यावर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचा पप्पू म्हणून उपाधी दिल्यानंतर आज आणखी एक चॅलेंज दिले. दोन वर्ष कशाला दोन दिवसांत तुम्ही वरळीतून आमदारकीचा राजीनामा द्या, मीपण सिल्लोडमधून लगेच देतो. एकदाचा खळे होवूच द्या, अशा शब्दात सत्तारांनी आदित्य ठाकरे यांना चॅलेंज दिले.

शिंदे गटाने राज्यात सत्तांतर घडवून आणल्यापासून आदित्य ठाकरे यांनी सगळ्या आमदारांना एकदा राजीनामा देवून पुन्हा निवडूण येवून दाखवा, असे आव्हान देत राज्यभरातून निष्ठा यात्रा काढली होती. अब्दुल सत्तार हे देखील ठाकरे यांच्या निशाण्यावर होते. यापुर्वी देखील सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले होते.

Team Global News Marathi: