आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ. म्याऊ’च्या घोषणा,

 

मुंबई | सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे हिवाळी अधिवेशन मुंबईत पार पडत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विधानभवनात अजब प्रकार घडला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भाजप नेते आणि आमदार नितेश राणेंनी खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळत आहे.

आज आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या नितेश राणेंनी आदित्य यांना पाहून म्याऊ. म्याऊच्या घोषणा दिल्या. नितेश राणे या घोषणा देत असताना भाजपचे नेते मात्र हसत होते. आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते.

यावेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. परीक्षा घोटाळा आदी मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवर घोषणा देत होते. विरोधक घोषणा देत असताना आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ. म्याऊ. म्याऊ. म्याऊ. अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली यावरून त्यांच्यासोबत असलेले इतर सहकारी हसत होते.

Team Global News Marathi: