सदस्यांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने सभागृहात अजित पवारांनी दाखवली नाराजी

 

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात काही सदस्य विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. सदस्यांनी मास्क न घतल्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी दर्शवली आहे.तसेच सर्वांना मास्क घालण्याची विनंतीही केली आहे. काय म्हणाले अजित पवार? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अध्यक्ष महोदय मला एका विषयाकडे आपल्या मार्फत सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे. कालपासून आपलं अधिवेशन सुरू झालं आजचा दुसरा दिवस आहे. आपण लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो.

देशाचे पंतप्रधान सुद्धा सध्याच्या कोरोनाच्या संकटावर गांभीर्याने विचार करत आहेत आणि रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा देशपातळीवर सुरू आहे. ठराविक लोक सोडली तर कुणीही येते मास्क लावत नाही. संपूर्ण महाराष्ट्र इथं काय चाललं आहे हे पाहतोय. जर आपणच मास्क लावू शकत नाही मी बोलताना पण मास्क लावतो. काहींना मास्क लावून बोलण्यात अडचणी येत असतील तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण बोलून झाल्यावर तरी मास्क लावला पाहिजे. आज इतकी वाईट परिस्थिती आहे की, परदेशात दीड दिवसाला दुप्पट रुग्णांची संख्या होत आहे.

डब्ल्यूएचओने सांगितलं आहे की, पाच लाखांपर्यंत परदेशात लोक मृत्यूमुखी पडतील. हे झालं परदेशाचं आपलं महाराष्ट्र आणि देशाचं काय. काही काही गोष्टी ज्या त्या वेळीच त्यातं गांभीर्य लक्षात घेऊन.. कुणी जर मास्क लावला नसेल मग मी जरी मास्क नसेल लावला तरी मला बाहेर काढा, कुठंतरी गांभीर्याने घ्याना. माजी विरोधी पक्षनेते आणि सर्वांनाच विनंती आहे की, मास्क लावा. अजित पवारांनी हे म्हटल्यानंतर अध्यक्षांनीही म्हटलं, सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की, सर्व सदस्यांनी आपले मास्क बोलण्यापूरते बाजूला करावे किंवा ज्याला शक्य आहे त्याने तोंडावर कायम मास्क ठेवावे.

Team Global News Marathi: