आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले, बैठक सुरु असलेल्या ठिकाणी कोसळला स्लॅब

ग्लोबल न्यूज : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेत होते. त्यावेळी मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. यामध्ये आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले. आज (शुक्रवारी) संध्याकाळी 4.45 वाजता ही घटना घडली.

झी 24 तास या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी होती. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: