सोने-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : गेल्या सत्रातील जोरदार घसरणीनंतर आज पुन्हा एकदा स्थानिक वायदा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. एमसीएक्सवर वायदा बाजारातील सोन्याचा दर 0.12 टक्यांनी घसरून 48619 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदीचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 70722 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला आहे.

दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे. गेल्या व्यापार सत्रात, सोन्याचा दर दोन टक्क्यांनी कमी झाला होता. तर चांदीचा दर 2.5 टक्के प्रति किलो ग्रॅमने कमी झाला होता. मार्च महिन्यात सोन्याचा दर जवळपास 44,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही कमी झाला होता.

अशी आहे जागतीक बाजारातील स्थिती –

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने मजबूत डॉलरमुळे दोन आठवड्यांचा विचार करता खालच्या स्थरावर पोहोचले आहे. स्पॉट सोने 0.4 टक्क्यांनी घसरून 1,862.68 डॉलर प्रति औंस वर आले आहे. गेल्या व्यापार सत्रात यात दोन टक्क्यांची घसरण झाली होती. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 27.31 डॉलर प्रति औंसवर आली होते. प्लॅटिनम 0.7 टक्क्यांनी घसरून 1,148.50 डॉलरवर आले होते. डॉलर इंडेक्स तीन आठवड्यात 90.543 वर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रात सोन्याच्या भावात घट झाली. सोन्याचे भावात 270 रुपयांची घट झाली. राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भाव 48,960 रुपये झाला आहे. काल सोन्याचा दर 49,230 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर तर २२ कॅरेट सोन्याचा भाव 47,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. काल हा दर 48,230 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. यासोबतच चांदीच्या भावात1200 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. त्यामुळे काल 72000 रुपये प्रति किलोग्रॅम असणारी चांदीची किंमत 70800 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर

मुंबई ४८ हजार ९६० ४९ हजार २३०
पुणे ४८ हजार ९६० ४९ हजार २३०
जळगाव ४८ हजार ९६० ४९ हजार २३०
कोल्हापूर ४८ हजार ९६० ४९ हजार २३०
लातूर ४८ हजार ९६० ४९ हजार २३०
सांगली ४८ हजार ९६० ४९ हजार २३०
बारामती ४८ हजार ९६० ४९ हजार २३०
पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर
मुंबई ४७ हजार ९६० ४८ हजार २३०
पुणे ४७ हजार ९६० ४८ हजार २३०
जळगाव ४७ हजार ९६० ४८ हजार २३०
कोल्हापूर ४७ हजार ९६० ४८ हजार २३०
लातूर ४७ हजार ९६० ४८ हजार २३०
सांगली ४७ हजार ९६० ४८ हजार २३०
बारामती ४७ हजार ९६० ४८ हजार २३०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर
मुंबई ७० हजार ८०० ७२ हजार ०००
पुणे ७० हजार ८०० ७२ हजार ०००
जळगाव ७० हजार ८०० ७२ हजार ०००
कोल्हापूर ७० हजार ८०० ७२ हजार ०००
लातूर ७० हजार ८०० ७२ हजार ०००
सांगली ७० हजार ८०० ७२ हजार ०००
बारामती ७० हजार ८०० ७२ हजार ०००

ग्लोबल न्युज नेटवर्क: