सुशांत प्रकरणी आदित्यचा संबंध नाही, मग राऊत का स्पष्टीकरण देतायंत – नारायण राणे

सुशांत प्रकरणी आदित्यचा संबंध नाही, मग राऊत का स्पष्टीकरण देतायंत – नारायण राणे

सिने-अभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरण साध्य तापलेले दिसून येत आहे. त्यातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यामुळे या प्रकरणाला वेगळीच डिश मिळलेली आहे. मात्र शिवसेनेनेकडून या सर्व आरोपाचे खंडन करण्यात आले.

मात्र आता भाजपा नेते तथा खासदार नारायण राणे यांनी थेट सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही तर मग शिवसेनेचे नेते संजय राऊत या प्रकरणावर प्रतिक्रिया का देत आहेत?, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.

नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सवाल केला. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मी कधीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. मीडियानेच त्यांचं नाव घेतलं आहे. सुशांतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने त्यावर निर्णय घ्यावा.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत बोलत आहेत. आदित्यचा याप्रकरणाशी संबंधच नाही तर राऊत का बोलत आहेत?, असा सवाल करतानाच राऊत वारंवार बोलत असल्यानेच या प्रकरणात संशय अधिक वाढला आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: