पुरेशा लससाठा अभावी आज पासून मुंबईत तीन दिवस लसीकरण राहणार बंद !

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे युद्ध पातळीवर लसीकरणाला सुरवात झालेली आहे. मात्र मुंबई पुढचे तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आलेले आहे. पुरेशा लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे आज, उद्या आणि परवा असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच १ मेपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे होणारे लसीकरण पुरेशा लससाठ्या अभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

या दरम्यानच्या महानगरपालिकेला लसीचा साठा प्राप्त झाल्यावर तसेच लसीकरण सुरु होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल असं पालिकेने म्हटलंय. नोंदणीकृत पात्र व्यक्तिंनाच आता लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. लसीकरणासाठी 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना काही केंद्रांवर रांगेत बराच वेळ उभे राहावे लागत आहे.

या नागरिकांनी चिंताग्रस्त होऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये. सर्वांचे लसीकरण होणार असे आवाहन पालिकेने केलं आहे. पालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून 63 लसीकरण केंद्रांवर तर खासगी रुग्णालयात ७३ लसीकरण केंद्रांवर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अलीकडे लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन दैनंदिन लसीकरण मोहिमेचे नियोजन प्रशासन करीत आहे.

Team Global News Marathi: