राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या अतिरिक्त कार्यभार

राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या अतिरिक्त कार्यभार

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिह कोश्यारीजी यांच्याकडे गोवा राज्याचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. गोव्याचे राज्यपाल मलिक यांनी मेघालय राज्याचा पदभार स्वीकारल्यामुळे गोव्याची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कोश्यारी यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली. सध्या गोव्यातील कोरोनाची परिस्थिती आणि त्यासंबंधित काही मुद्द्यांमुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या तणावामुळे मलिक यांची बदली केली, अशी माहिती आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: