कोविड सेंटर घोटाळ्यात मनसेने लगावले महापौरांच्या मुलावर आरोप…!

कोविड सेंटर घोटाळ्यात मनसेने लगावले महापौरांच्या मुलावर आरोप…!

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संकटात कोरोना रुग्नांवर उपचार करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतर्फे तात्पुरते स्वरूपाचे कोविड केअर सेंटर जागोजागी उभारण्यात आले होते. मात्र या कोविड केअर सेंटरच्या उभारणीत घोटाळा झाल्याचे पुरावे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने समोर आणला आहे.

कोरोना रुग्नांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत मनसेने थेट मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनाच लक्ष्य केले आहे. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेच्या संदीप देशपांडे केला आहे.

‘महापालिकेचा हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून सभागृहही चालू दिले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना केवळ मुंबई महापालिकेचेच सभागृह बंद का,’ असा प्रश्नही देशपांडे यांनी केला. ‘या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही देशपांडे यांनी केली

ग्लोबल न्युज नेटवर्क: