अभिनेत्री उर्फी जावेदचे ‘या’ दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली की,

 

मुबई | अभिनेत्री उर्फी जावेद बिग बॉसमधून घराघरात पोहोचली. उर्फी तिच्या हटके कपड्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय असते. मात्र अभिनेत्री उर्फी जावेद एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदी याच्यावर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप उर्फी जावेदने केला आहे.

अभिनेत्री उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. आफ्रिदीने एका म्युझिक व्हिडिओसाठी कॉम्प्रोमाईज करायला सांगितले असल्याचा आरोपही उर्फीने केला आहे. आफ्रिदीने एका म्युझिक व्हिडिओसाठी कॉम्प्रोमाईज करायला सांगितले. त्यानंतर त्याने अयोग्य वागणूक दिली व अपशब्द देखील वापरले, असे आरोप उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून केले आहेत.

दरम्यान, हे सगळं मी पैशासाठी करत नाहीये. मला फक्त कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदीचा पर्दाफाश करायचा आहे, असं देखील उर्फी जावेदने स्पष्ट केलं आहे.

Team Global News Marathi: