अभिनेत्रीचा वडिलांवर आरोप, बाबा माझा खून करू शकतात
कुंमकुंम भाग्य अभिनेत्री फेम तृप्ती शंखधरने आपल्याला जन्मद दिलेल्या वडिलांवरच काळबळजनक आरोप लावला आहे. आपल्या पित्याकडून स्वतःच्या आणि आईच्या जीवाला धोका असल्याची माहिती तृप्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे.
अवघ्या १९ वर्षाच्या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर स्टोरी व्हिडिओ शेअर करत हा धक्कादायक खुलासा केला आहे. या व्हिडिओत त्याच्या सोबत तिची आई देखील दिसून येत आहे. तुप्तीच्या आईनेही मुलीं सोबत घर सोडले आहे.
आईनेही नवऱ्यावर मारपीट केल्याचा आरोप केला. तृप्तीची आई म्हणाली की, “मला बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं आणि मला कोणाशी बोलूही दिलं जायचं नाही. या सर्व गोष्टींमुळे मी खूप अस्वस्थ होते.बारादरी येथील ग्रीन पार्क रहिवासी राम रतन शंखधर यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्याचेही तिने सांगितले आहे.
व्हिडिओमध्ये तृप्ती म्हणाली की, माझे वडिल राम रतन शंखधर यांनी मला मारहाण केली आहे. त्यांनी माझे केस पकडून मारले. तिने तिच्या हातावरील जखमेच्या खुणाही व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. बरेली येथे राहणाऱ्या तृप्तीने पुढे सांगितले की, त्यांनी मला मुंबईला पाठवले होते. आतापर्यंत माझा एकच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतू ते मला लग्न करण्यासाठी दबाव टाकत आहेत. असा आरोप तीन जन्मदात्या पित्यावर लावला आहे.