अभिनेता संजय दत्त ची कॅन्सर वर यशस्वी मात; चाहत्यांचे मानले आभार

ग्लोबल न्यूज – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. पण पडद्यावरच्या या मुन्नाभाईनं कर्करोगावर मात केली आहे. संजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कर्करोगमुक्त झाल्याचं सांगितलं आहे.

संजय दत्तने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘गेले काही महिने माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. असं म्हणतात की देव बलवान सैनिकाचीच सर्वात कठीण परीक्षा घेतो. आज, माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी ही लढाई जिंकून परत आलो हे सांगायला आनंद होत आहे.

मी माझ्या मुलांना आणि कुटुंबाला याहून चांगलं गिफ्ट दुसरं काही देऊ शकलो नसतो. तुमचा विश्वास आणि पाठबळाशिवाय हे सर्व शक्य झालं नसतं. मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि त्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानतो जे या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझी ताकद झालात.मला भरभरून प्रेम आणि असंख्य आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार. ‘

यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला होता. गेल्या आठवड्यात त्याचा पीटीई रिपोर्ट आला असून, त्यानुसार संजय दत्त कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला

ग्लोबल न्युज नेटवर्क: