मुंबई | टाईमपास चित्रपटामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता प्रथमेश परब याच्या सोशल मीडियावरील फोटोची चर्चा सुरु झाली आहे, आज प्रत्येक जण आयुष्यात एक घर आणि एक गाडी घेण्याची प्रचंड इच्छा किंबहुना एक स्वप्नच असते. मात्र ते सर्वांचेच पूर्ण होईल असे नाही. कलाकारांसाठी देखील या दोन गोष्टी घेणे अवघड असते. मात्र हीच किमया करून दाखवली आहे, मराठीमधील लोकप्रिय अभिनेता असलेल्या प्रथमेश परब याने.
नुकताच प्रथमेशने त्याचा २८ वा वाढदिवस साजरा केला. रोमँटिक भूमिका केलेल्या प्रथमेशने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःलाच एक अविस्मरणीय आणि महागडे असे गिफ्ट दिले आहे. प्रथमेशने एक आलिशान गाडी स्वतःला वाढदिवसाच्या दिवशी भेट केली आहे. हो, प्रथमेशने नुकतीच हुंडाईची काळ्या रंगाची ‘क्रेटा’ गाडी स्वतःला गिफ्ट करत त्याचा २८ वा वाढदिवस अधिकच संस्मरणीय केला आहे. या गाडीची किंमत १० लाखांपासून सुरू होऊन १८ लाखांपर्यंत आहे.
प्रथमेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रथमेशने गाडी घेतल्याची माहिती दिली आहे. प्रथमेशने गाडीसोबतच स्वतःचा एक फोटो शेअर केला असून, कॅप्शनमध्ये लिहिले, “जोपर्यंत तुम्हाला तुमची पात्रता मिळत नाही तोपर्यंत थांबू नका.” त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रथमेश गाडीसोबत उभा असून, त्याच्या चेहेऱ्यावरचे समाधान आणि आनंद यात स्पष्ट दिसून येत आहे.