डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने आणला डीएसपी फ्लोटर फंड

डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेडने डीएसपी फ्लोटर फंडाची (योजना) घोषणा केली आहे. ही एक खुली डेट योजना असून प्रामुख्याने सार्वभौम रोखे (सॉव्हरीन बॉण्ड्स) आणि ओव्हरनाइट इंडेक्स स्वॅप्स (ओआयएस) यांच्यात गुंतवणूक करते. त्यायोगे गुंतवणूकदारांना व्याजदराच्या चक्रांचा अंदाज घेण्यात मदत होते. एनएफओ ४ मार्च, २०२१ रोजी खुला होणार असून, १७ मार्च, २०२१ रोजी बंद होणार आहे.

डीएसपी फ्लोटर फंड हे लघुकालीन विभागातील (कालावधी श्रेणी १ ते ४ वर्षे) अशा प्रकारचा एकमेव फंड आहे. यामध्ये ओआयएसमधील पेड पोझिशन्सचा वापर करून व्याजदरांवर मर्यादा घातली जाते. व्याजदरांच्या चक्रांतील बदलांची फारशी चिंता न करता गुंतवणूकदारांना तुलनेने स्थिर मोबदला मिळवून देण्याचे उद्दिष्ट या योजनेपुढे आहे. व्याजदर चक्रांचा अंदाज सुयोग्य पद्धतीने घेण्याचे उद्दिष्ट या योजनेपुढे आहे. यामध्ये व्याजदरात घसरण झाली की उत्पन्न प्राप्त करण्याची संभाव्यता आहे तसेच व्याजदराचे चक्र पूर्वपदावर येण्याच्या काळात पोर्टफोलिओ मोबदल्याचे रक्षण करण्याचेही उद्दिष्ट आहे.

ही योजना किमान ६५ टक्के आणि कमाल १०० टक्के गुंतवणूक ही फ्लोटिंग दरावरील डेट सिक्युरिटीजमध्ये करते. यात प्रामुख्याने राज्य तसेच केंद्र सरकारांनी जारी केलेल्या सॉव्हरिन सिक्युरिटीज आणि कृत्रिम तरलता दराशी संपर्क निर्माण करणाऱ्या ओआयएसचा समावेश असतो. निश्चित उत्पन्नाच्या डेट सिक्युरिटीजमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याचा प्रस्तावही या योजनेत आहे. यांमध्ये मनी मार्केट उत्पादनांचा समावेश होतो.

या योजनेत सक्रिय आणि निष्क्रिय फंड व्यवस्थापनाचे घटक आहेत. पेड ओआयएस पोझिशन्सचे सक्रिय व्यवस्थापन केले जाते, तर सरकारी सिक्युरिटीज आणि स्टेट डेव्हलपमेंट लोन्सबाबत निष्क्रियतेचे धोरण अवलंबले जाते. ज्यांना मुदत ठेवींना पर्याय म्हणून कमी जोखमीचा मार्ग १ वर्षापासूनच्या किमानधारणा कालावधीसह हवा आहे आणि पतजोखीम नसलेल्या व उच्च रोखतेच्या पोर्टफोलिओंना ज्यांचे प्राधान्य आहे अशा गुंतवणूकदारांसाठी ही योजना अनुकूल आहे.

“रोल डाउन फंड्सना ३ वर्षांमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. डीएसपीने आपला स्वत:चा रोल डाउन फंड- कॉर्पोरेट बॉण्ड फंड- २०१८ मध्ये दर उच्‍च (९ टक्के) असताना आणला. व्याजदराचे चक्र पूर्ववत होण्याची चिन्हे दिसू लागली असता, आता रोल डाउन सॉव्हरीन फंड (लघु कालावधीचा) ओआयएससह आणण्यासाठी चांगली वेळ आहे असे आम्हाला वाटले. ओआयएसमुळे व्याजदरांची जोखीम कमी करण्यामध्ये मदत होते. मुदत ५ वर्षांपर्यंत विस्तारण्याचा पण व्याजदर वाढल्यास चढउतार किमान पातळीवर राखण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे अध्यक्ष कल्पेन पारेख सांगतात.

Team Global News Marathi: