मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढल आहे. त्यात अनेकांना कोरोनाची लागण होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यातच अनेक सेलिब्रिटी, राजकीय पुढारी यांना सुद्धा कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले होते. त्यात मराठी बिगबॉस फेम अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नी कादंबरी कडू यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ३९ वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. अभिनेता म्हणून भूषण कडू याची पत्नी कांदबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातील त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. पण, प्रकृतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना मुंबईतील परेल येथील केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पत्नी कांदबरीच्या निधनामुळे कडू कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. भूषण यांना प्रर्किर्थ कडू हा ७ वर्षांचा मुलगा आहे. कादंबरी या भूषण कडू यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. विनोदी अभिनेता म्हणून भूषण कडू संपूर्ण महाराष्ट्राला परिचित चेहरा आहे. अनेक चित्रपट, नाट्य आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडी एक्स्प्रेस या मालिकेमधून भूषण कडूने सर्वांना खळखळून हसवलं. कलर्स वाहिनीवरील मराठीतील पहिल्या बिग बॉसमध्ये भूषण कडूने आपली दखल घेण्यास सर्वांना भाग पाडले होते.