अभिनेता अमिताभ बच्चन स्टारर बहुप्रतीक्षित ‘झुंड’ लवकरच होणार रिलीज

 

सैराट चित्रपटामुळे प्रसिद्ध झोतात आलेले दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मागील वर्षी या चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट बनून तयार झाला आहे. पण करोना संकटामुळे हा चित्रपट अडकला.

या चित्रपटाचे डायरेक्शन नागराज मंजुळे यांनी केले असल्यामुळे चित्रपट कधी रिलीज होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘झुंड’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याची चर्चा होती. परंतु हा चित्रपट कुठं ही प्रदर्शित होणार नाही. असं स्वतः नागराज मंजुळे यांनी सांगितलं आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण सर्वच जण ‘झुंड’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहात, कारण या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ‘झुंड’ चित्रपट प्रदर्शित करू असं स्पष्ट नागराज मंजुळे यांनी सांगितलं. तसेच, सद्या सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. हा चित्रपट थिअटरला रिलीज व्हावा अशी माझी इच्छा आहे असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: