एसी लोकल चे तिकीट दर कमी करा, शिवसेना खासदाराने केली लोकसभेत मागणी

 

मुंबई | मुंबईत धावणाऱ्या एसी लोकल मध्ये प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी एसी लोकलचे तिकीट दर सामान्य माणसाला परवडणारे करावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. रेल्वेच्या अनुदान मागण्यांसंदर्भात लोकसभेत बोलाताना त्यांनी ही मागणी केली.

खासदार राहुल शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले की, मुंबईत सुरू करण्यात आलेल्या एसी लोकल ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आजमितीला खूपच कमी आहे. या मोजक्या प्रवाशांसाठी रेल्वे ला प्रसंगी तोटा पत्करून या एसी ट्रेन चालवाव्या लागताहेत.

 

तसेच, एसी ट्रेन मुळे साध्या लोकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होऊन फलाटावर गर्दी वाढते. यावर उपाय म्हणून रेल्वेने एसी लोकल चे तिकीट दर कमी केले तर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल आणि परिणामी रेल्वेचा तोटा देखील होणार नाही.

तसेच अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोबाईल क्लिनिक सुरू करण्यात यावे, अशीही मागणी खासदार शेवाळे यांनी केली. यासह, लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी 500ज्यादा कोचेस ची व्यवस्था, प्लॅटफॉर्म ची उंची वाढविण्याचा कामाला गती द्यावी, दादर रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पात फेरीवाले आणि पार्किंग ची व्यवस्था करावी, पावसाळ्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी रेल्वेने मुंबई महानगर पालिकेच्या ब्रिमस्टॉवड प्रकल्पाची डिझाईन घ्यावी यांसह अन्य विषयांवर खासदार शेवाळे यांनी सूचना केल्या.

Team Global News Marathi: