अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका

 

अभिनेत्री राखी सावंत तीच्या विधानामुळे आणि फो़टोंमुळे कायम चर्चैत असते. तसेच ती सामान्यांमध्ये लवकर मिक्स होते आणि तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत असतात.पण सध्या तीच्या एका व्हिडीओमुळे ती अडचणीत आली आहे. मुंबईत केलेल्या तीच्या कृत्यामुळे तीचे चाहते देखील तीच्यावर नाराज आहेत.

काही दिवसांपूर्वी राखी सावंत अंधेरी येथे खरेदी करण्यासाठी भर रस्त्यात म्हणजेच तीच्या गाडीच्या मागे अनेक गाड्या असताना देखील गाडी रस्त्यात उभी करून खाली उतरली. त्यामुळे इतर वाहनांची कोंडी झाली. ती येईपर्यंत तीच्या गाडीच्या मागे वाहनांची रांग लागली होती. त्यावेळी हम जहा खडे होते है वहासे लाइन शुरू होती असंही तीने वाहन चालकांना सुनावलं. त्यामुळे नागरिक तीच्यावर चांगलेच संतापले आहेत.

तीच्या या कृत्याचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तीचे चाहतेही तीच्यावर नाराज झाले आहेत. यावर नेटकरी अनेक कमेंट्स करत तीला सुनावत आहेत. ती अशी सर्वसामान्यांच्या वाहतुकीला अडथळे आणू शकत नाही. तीच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी एकाने केली आहे.

अंधेरी लोखंडवाला ओशिवरा सीटीझन्स असोसिएशनने राखी सावंतचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावर ओशिवरा वाहतूक विभागाचे वरिष्ठक निरीक्षक दिलीप भोसले यांनी माहिती दिली की आम्ही वाहतुकीत अडथळे आणणाऱ्या वाहनाविरूद्ध चलन काढले आहे. मुंबईत अशा प्रकारे कृत्य केल्यास 500 रूपायांचा दंड भरावा लागतो.

पोलिसांच्या घराला राज्य शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य !

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोर आमदाराला बहिणीचंच आव्हान !

Team Global News Marathi: