अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुक सुरू होताच केली पहिली पोस्ट

 

अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. काही दिवसांआधीच केतकी चितळेचा एक एपिसोड चांगलाच गाजला होता. होय, एका वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे केतकीला तुरुंगाची हवा खावी लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं केतकी चितळेला महागात पडलं होतं.

केतकी विरोधात राज्यभरात 22 एफआयआर दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अटक झाल्यानंतर केतकी 41 दिवस तुरूंगात होती. सध्या ती जामीनावर आहे. पण आता पुन्हा एकदा चर्चा आहे ती केतकीच्या नव्या फेसबुक पोस्टची चर्चा सुरु झाली आहे. जामीनावर झालेल्या सुटकेनंतर आता केतकीला पुन्हा एकदा तिच्या फेसबुक अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळाला आहे.

केतकीचं फेसबुक अकाऊंट पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झालं आहे आणि एफबी अकाऊंट सुरू होताच आनंदाच्या भरात केतकीन पोस्ट केली आहे.
अखेर मला माझ्या फेसबुकचा अ‍ॅक्सेस परत मिळाला आहे; निदात तात्पुरता तरी…LOL’, अशी पोस्ट केतकीने शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

Team Global News Marathi: