अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले,

 

अभिनेत्री ‘केतकी चितळे’ ही तिच्या अभिनयापेक्षा वेगळ्याच कारणाने नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.केतकीच्या काही अशाही पोस्ट आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. आता पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये केतकीने तिच्या स्टाइलने चाहत्यांना गोड बोलण्याचा सल्ला दिला आहे.

तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया आकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र, आता केतकीचे ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. “जे वर्षानुवर्षे मी लिहीत आले आहे.. तेच आज पुन्हा लिहिते आहे, तीळगूळ खा व खोटे गोड गोड न बोलता कडू सत्य बोला… मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.!!’ या आशयाची पोस्ट तिने केली आहे.

दरम्यान, केतकीच्या या पोस्टला काही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे. “ही पोरगी बिनधास्त बोलते पण नेहमी सकारात्मक हसतमुख खरं बोलते पण काही लोकांना मात्र टोचते, पटलं हे आपल्याला’. असं एका नेटकाऱ्यानी म्हंटलं आहे.

Team Global News Marathi: