अप्रतिम स्टाईलने चाहत्यांमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी एक अभिनेत्री म्हणजे दिशापटनी. सध्या मोहित सुरी दिग्दर्शित एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटात दिशाने प्रमुख भूमिका साकारलीय. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारियासबित दिसणारे. तेव्हा याच निमित्ताने दिशाने नवराष्ट्रच्या टीमशी विशेष बातचीत केली. या बातचीतमध्ये तिने या सिनेमासह सोशल मीडिया, ट्रोलिंग, फिटनेस अशा अनेक गोष्टींबाबत दिलखुलास गप्पा मारल्या
मी याबद्दल जास्त विचार करत नाही. कारण जर मी जास्त विचार केला तर ते माझ्यासाठी स्वयं तणावपूर्ण होईल, मला जे काही काम मिळतंय, ते मी मनापासून करतेय आणि मला सुनत काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी कृतज्ञ आहे. मोहित सूरीसोबत ‘मलंग’ चित्रपटात काम केल्यानंतर मी त्यांची खूप मोठा फॅन झालीय. त्याच्याकडे असलेल्या कलेमुळे त्याचे चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळे आहेत.
तसंच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ निवडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यातील ‘रसिका’ या पात्रानं मला आकर्षित केलंय. हे पात्र माझ्या इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे. या व्यक्तिरेखेशी एक वेगळंच नातं मला जाणवलं. फॅशन आयकॉनबद्दल माहित नाही. पण मी माझ्या सोयीनुसार माझी फॅशन निवडते. या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, माझी टीम माझ्या फॅशनवर खूप मेहनत घेतेय.
“२५ वर्षे सत्तेत सडलो म्हणता, यांनी अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय?”
केंद्रात श्रीकांत शिंदे यांना संधी’? पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना देणार स्पेशल गिफ्ट