रणवीर सिंगने सोशल मीडियावर न्यूड फोटोशूटचे फोटो शेअर केल्याने तो वादात सापडला आहे. त्याला सतत ट्रोल केले जात आहे परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असे काही लोक आहेत जे अभिनेत्याचे समर्थन करताना दिसतात. आलिया भट्ट, राम गोपाल वर्मा, अर्जुन कपूर, स्वरा भास्कर यांच्यानंतर आता या लांबलचक यादीत अभिनेत्री विद्या बालनच्या नावाचाही समावेश झाला आहे.
रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच अभिनेत्री विद्या बालन मुंबईत कुब्रा सैतच्या ‘ओपन बुक’ या पुस्तकाच्या लाँचिंग कार्यक्रमात पोहोचली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना विद्याने रणवीरच्या न्यूड फोटोशूटबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली, ‘त्याने काय चूक केली?’ कधी-कधी आपल्यालाही असं काही पाहावं लागतं.
विद्याच्या या प्रतिक्रियेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच विद्या बालन व्यतिरिक्त, मंजरी फडणीस, नकुल मेहता, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, झाकीर खान यांसारखे सेलिब्रिटी बुक लॉन्च इव्हेंटमध्ये उपस्थित होते नंतर दुसरीकडे रणवीर सिंह याच्या या फोटोशूटवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.
‘…तर अजित पवारांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही, हा भाजपा नेता स्पष्टच बोलला
ओबीसी आरक्षणाविनाच ‘त्या’ निवडणुका घ्या; न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलं