अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस, राष्ट्रवादीची घोषणा

 

सुप्रिया सुळेयांच्या विषयी अनुद्गार काढणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केले जात आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडा असे आवाहन करत, कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केली आहे.

शिंदे गटावर ‘पन्नास खोके’ असा सतत होत असलेल्या आरोपाला उत्तर देतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत टीका केली होती. सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घरासमोर आंदोलन करत त्यांच्या घराची तोडफोड देखील करण्यात आली. त्यातच आता जालना येथील राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर यांनी अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्तार आणि राष्ट्रवादीमधील वाद आणखीनच वाढतांना पाहायला मिळतोय.

यावर बोलतांना राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर म्हणाल्यात की, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा निषेध केला पाहिजे. फक्त सुप्रिया सुळे यांचाच नाही तर राज्यातील सर्वच महिलांचा सत्तार यांनी अपमान केला आहे. सुप्रिया सुळे या अब्दुल सत्तार यांच्या सात पिढ्या विकत घेऊ शकतात. तर अब्दुल सत्तार महाराष्ट्रात जिथे दौऱ्यावर असतील तेथील तिथे त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कपडे फाडावे आणि कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस माझ्याकडून देण्यात येईल असे रेखा तौर म्हणाल्यात.

Team Global News Marathi: