आदित्यला खांद्यावर फिरवले, त्याला मारण्याची भाषा वापरणार नाही

 

उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना थेट ललकारून जोरदार निशाणा साधला. विशेषत: बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना आदित्य ठाकरेंनी ‘चुन चुन के मारेंगे’ असे आव्हान दिले होते.मात्र त्यांच्या या आव्हानांला सत्ताधारी शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

संजय गायकवाडांनी यांनी आदित्य ठाकरेंना मी माझ्या खांद्यावरून लोणार सरोवर फिरायला घेऊन गेलो होतो, असे म्हणत मी लहानांवर हात उगारत नसल्याचे म्हटले आहे. बुलढाणा दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या विविध धोरणांवर टीकास्र सोडले होते.

यादरम्यान, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून सरकारला लक्ष्य करताना सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीही आदित्य ठाकरेंनी उचलून धरली. ‘चुन चुन के मारेंगे. चला, मी चॅलेंज देतो. मी एकटा चालत येतो तुमच्या मतदारसंघात, तुम्ही समोरून एकटे चालत या, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सोमवारी संजय गायकवाड यांनाही थेट आव्हान दिले होते.

संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेनेचे काही नेते सतत माझे नाव घेत आहेत. चुन चुन के मारेंगे असे आव्हान ते देत आहेत. मी हे वाक्य बोललो आहे हे मी नाकारत नाही. पण मी कुणाबद्दल बोललो? जे स्थानिक लोक गलिच्छ भाषेत आमची टिंगल टवाळी करतात, अशा लोकांबद्दल आम्ही बोललो. आणि आम्ही बोललोच नाही, तर आम्ही ते करूनही दाखवलं, असे म्हणत संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले.

काल आदित्य ठाकरे म्हणाले, मी बुलढाण्याला चाललो आहे. चुन चुन के मारो म्हणणाऱ्यांना माझे चॅलेंज आहे की त्यांनी समोरून एकटे यावे. मला आठवते की २००२ मध्ये मी माझ्या खांद्यावर आदित्य ठाकरेंना लोणारच्या सरोवरावर घेऊन फिरायला गेलो होतो. ठाकरे परिवाराचा आम्ही आदर करतो. मी कधीही लहान मुलांच्या अंगावर हात उचलत नाही, उचललेला नाही.

Team Global News Marathi: