मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या पाटील करताहात राज कुंद्राला काही दिवापूर्वी पॉर्नफ्लीम प्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या अद्यापही या प्रकरणाची चौकशी सुरु असून राज कुंद्राला जामीन मिळालेला नाही. त्यातच आता शिल्पा आपल्या पतीपासून वेगळे राहण्याचा विचार करायला लागली आहे. शिल्पाच्या एका मैत्रिणीने याबाबतची माहिती दिली आहे.
नवरा राज कुंद्राला अश्लील फिल्मस बनवण्याच्या आरोपात तुरुंगात टाकल्यावर शिल्पाने आता दोन्ही मुलांना घेऊन वेगळे राहण्याचा विचार सुरू केला आहे. राज कुंद्राच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही लक्षणे सध्या दिसत नाहीत. उलट या अडचणी दिवसेंदिवस वाढायला लागल्या आहेत. तसेच चौकशीची ससेमिरा पाठी लागला आहे.
राज कुंद्रा अश्लील सिनेमांच्या उद्योगात गुंतला असल्याचे समजल्यावर जेवढा धक्का इतर सर्वजणांना बसला तेवढाच शिल्पालाही बसला आहे. इतके दिवस जी ऐषारामाची लाइफस्टाइल एन्जॉय करते आहे, ती राज कुंद्राच्या या उद्योगाच्या जोरावर होती, हे सत्य पचवणे शिल्पाला जड जाते आहे. वाईट कामातून मिळालेल्या पैशांपासून आपल्या दोन्ही मुलांना दूर ठेवावे असे आता तिला वाटायला लागले आहे. आता राज कुंद्राच्या एका पैशालाही हात लावायचा नाही, असे तिने ठरवून टाकले आहे.