बातमी आयफोनची. सध्या तरुणाईमध्ये Apple iPhone 13 ची वेगळीच क्रेझ आहे. फोन महाग असला तरी बाकीच्या मोबाईल तुलनेत तो सर्वोत्तम मानला जातो. यावर कोणतीही ऑफर आली तर चाहते खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आज iPhone 13 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट उपलब्ध आहे.
काही दिवसांपूर्वी अॅपल आयफोन 13 वर Amazon India वर 10,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली होती. आता Amazon India समर सेल सुरू झाल्यामुळे, iPhone 13 वर आणखी सूट मिळाली आहे. 128GB मॉडेलप्रमाणे, iPhone 13 256GB आणि 512GB मॉडेल्सच्या किंमतींमध्येही सुमारे 10,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यांची किंमत अनुक्रमे 79,490 आणि 99,990 रुपये झाली आहे.
iPhone 13 च्या सर्व प्रकारच्या मोबाईलवर ही ऑफर उपलब्ध आहेत. दरम्यान, आयफोन 13 बॉक्समध्ये चार्जिंग ब्रिकशिवाय देण्यात येत आहे. त्यामुळे प्रथमच आयफोन खरेदी करणार्यांना Apple 20W USB-C पॉवर अॅडॉप्टरसाठी अतिरिक्त 1,899 रुपये मोजावे लागतील. या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2532×1170p रिझोल्यूशन आणि 460ppi पिक्सेल डेनसिटी 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED स्क्रीन आहे.