मुंबई | सतत वादग्रस्त विधानामुळे चीअर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत सध्या आपल्या ‘थलायवी’ची जादू, या नव्या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली असून कंगना राणावत’चा ‘थलायवी’ हा सिनेमा नुकताच देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाकडे सुरूवातीपासून सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कंगनाचा सिनेमा म्हणून अपेक्षा होत्याच.
तसेच बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा काय जादू दाखवतो, याकडे संपूर्ण छत्रपती इंडस्ट्रीचं लक्ष होतं. सिनेमातील कंगनाच्या कामाचं भरभरून कौतुक झालं. पण बॉक्स ऑफिसचं म्हणालं तर हा सिनेमा फार काही कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या दिवशीची कमाई तर कंगनाच्या या सिनेमाने अक्षय कुमारच्या ‘बेटबॉटम’पेक्षाही कमी गल्ला जमवला.
हिंदी, तामिळ व तेलगू भाषेत रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त १.४४ कोटींची कमाई केली. यात हिंदी व्हर्जनचा वाटा केवळ २५ लाखांचा होता. वीकेंडला ‘थलायवी’ चांगला गल्ला जमवेल, ही अपेक्षाही फोल ठरली. पण पहिल्या वीकेंडला या सिनेमाने केवळ ४.८६ कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजनंतरच्या ३ दिवसांत चित्रपटाला ५ कोटींचाही टप्पा गाठता आला नाही.