आम्ही येथे एकत्र नाहीच आहोत, मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांचा सेनेला दणका

 

“आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार आहोत,” अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. आगामी काळात राज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर एच. डब्ल्यू. मराठीने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची आज (१९ मे) मुलाखत घेतलेली आहे. या मुलाखतीत भाई जगताप यांनी आप मुंबई पालिकेची निवडणूक, वार्ड पुर्नरचना, काँग्रेस पालिका निवडणूक एकटी लढणार आदी मुद्यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस महाविकासआघाडीसोबत लढणार का?, यासंदर्भात एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यावर भाई जगताप म्हणाले, “आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार आहोत असे विधान त्यांनी केले होते.

मुंबई काँग्रेस ही पालिका निवडणुकीत युती करणार नाही. समजा उद्या एच. के पाटील मुंबईत येणार आहेत. जर उद्या दिल्लीच्या नेत्यांनी काही ठरवले. तर मात्र, आम्ही त्या पद्धतीने करावे लागेल. पण, आम्ही राहुल गांधी यांच्या जवळ बोललो आहे की, आम्हाला एकटे लढू द्या, आम्ही एकटे लढायला तयार आहात. त्यामुळे माची भूमिका ही मुंबई काँग्रेसला एकटे लढायला परवागी द्या, अशी माझी भूमिका राहील.

Team Global News Marathi: