आमदारांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच गोव्यात पोहचलो”

 

महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी काल शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.गुरूवारी राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट गोवा गाठलं, आणि आपल्या आमदारांची भेट घेतली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना गोव्याच्या ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे त्या हॉटेलमध्ये माध्यमांचा कॅमेरा पोहचला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मध्यरात्री सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केलं. यावेळी पेढे वाटण्यात आले. माझ्यासोबत असणाऱ्या 50 आमदारांच्या विश्वासामुळे आजचा दिवस उगवला असून तो अनपेक्षित असा आहे असं राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ज्या आमदारांमुळे मला मुख्यमंत्रीपद मिळालं त्या आमदारांना पहिल्यांदा भेटायला येणं कर्तव्य आहे. आणि म्हणून मध्यरात्री गोवा विमानतळावर पोहचलो असल्याची भावना महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केली आहे.

Team Global News Marathi: