‘आमदार व्हायची लायकी होती का? तुमचं राजकीय करिअर संपलंय कारण..’,

 

नाशिक | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोरांनी सेना सोडली हे जाहीर करावं, असं राऊत म्हणाले. २-४ लोकं तिकडे गेले तर शिवसेना संपत नाही. बंडखोरांनी सेना सोडली हे जाहीर करावं. गेलात तर सुखात राहा, सेनेचं नाव का घेता? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचा दिल्लीतून थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन बंडखोरांनी पाठित खंजीर खुपसला. हा वाद ईमान आणि बेईमानीचा आहे. या बंडखोरांची आमदार व्हायची लायकी होती का? शिवसेना ही चार अक्षर पाठिशी नसती तर नगरपंचायतीत निवडून येणं कठीण झालं असतं. कोण होता तुम्ही आणि आम्ही. शिवसेनेने आम्हाला खासदार, आमदार, मंत्री केलं, असंही राऊत म्हणाले. ‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन परत यावं,’ संजय राऊत यांनी शिंदेंना डिवचलं जे गेलेत त्यांना कळेल की त्यांनी किती मोठं पाप केलं आहे. हा इतिहास आहे शिवसेनेचा.

त्यांचं राजकीय करिअर संपलं आहे. शिवसेना सोडून गेलेल्यांना कधी सुख लाभलं नाही. नारायण राणे, भुजबळ यांच्यासोबत हेच घडलं. आताच्या ४० लोकांची यापेक्षाही वाईट अवस्था होईल. उद्धवजी आजारी असताना पाठीत खंजीर खुपसला.. मात्र शिवसेनेचं असं होतं तेव्हा सेना दुपटीने उसळते आणि पुढे जाते, असं राऊत म्हणाले. बाळासाहेंबांचा आत्मा हे सगळं बघतोय, फोटो लावल्याने काही होतं नाही त्यांनी आशिर्वाद द्यावा लागतो, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

Team Global News Marathi: