अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच हुनमान चालीसा म्हणणारच असा निर्धार करून आलेले अमरावती बडनेराचे आमदार रवी राणा यांना जेलची हवा खावी लागली. आज रवी राणा यांचा वाढदिवस आहे. पण, आपला वाढदिवस जेलमध्येच साजरा करण्याची बारी राणांवर आली. आपली वडील लवकर जेलमधून सुटावे अशी इच्छा त्यांच्या लेकीने केली आहे. युवा स्वाभिमानचे संस्थापक आणि आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी कार्यकर्ते जमा झाले आहे.
कार्यकर्त्यांद्वारे हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण करणार आहे. तसंच ११०० दिव्यांनी सजविले राणा यांचे निवासस्थान सजवले आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सध्या मुंबईतील तुरुंगात तुरुंगात आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना एकटे वाटू नये म्हणून युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी सुंदर कांड हनुमान चालीसाचे पठण ठेवले आहे.
कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या आई वडिलांचे पूजन केले आहे. यावेळी रवी राणा यांच्या आईंना अश्रू अनावर झाले. तसंच, माझ्या आई वडिलांची सुटका व्हावी यासाठी मी प्रार्थना करत आहे, असं राणा दाम्पत्यांची कन्या नंदिनी राणा हिने सांगितलं. नवनीत राणा आणि युसुफ लकडवाला कर्ज प्रकरणाची होणार चौकशी दरम्यान, हनुमान चालीसा पठण प्रकरणामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.