आमदार नितेश राणेंनी शेअर केला अब्दुल सत्तारांचा ‘तो’ व्हिडिओ

 

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच भारतीय जंत पक्षच नेते नि आमदार नितीश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा 2017 मधील वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला आहे. य व्हिडिओच्या माध्यमातून पूण एका राणे त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करत अब्दुल सत्तार यांनी भगवान हनुमानाचे नाव घेत शिवीगाळ केल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओत अब्दुल सत्तार हे पोलिसांच्या उपस्थितीत काही आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ करताना दिसत आहेत. नितेश राणेंनी या व्हिडिओद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले असून, सत्तारांच्या अटकेची मागणी केली आहे.

आमदार नितेश राणेंनी शेअर केलेल्या व्हिडिओवर ‘शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार प्रभू हनुमानाबद्दल अर्वाच्च शिवीगाळ करताना. उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणतात ना…मग सत्तारांना तुरुंगात डांबून दाखवा,’ असे आव्हान केले आहे. यावर अद्याप अब्दुल सत्तारांकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली असून सेनेच्या बड्या नेत्यांनी यावर मौन बाळगले आहे.

Team Global News Marathi: