आमदार फुटले की पाठवले? कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या गोटात संशयाची सुई

 

एकनाथ शिंदे यांनी बंद पुकारल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची धाकधूक वाढली आहे अशातच संशयाचं वातावरण देखील निर्माण होताना दिसत आहे. शिवसेनेच्यामध्ये बंडाळी निर्माण झाली. त्यात एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार जाताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत जे आमदार उपस्थित होते, ते देखील आता शिंदे गटात जाताना दिसत आहेत.

या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. यापूर्वी शिवसेनेत अनेक नेत्यांनी बंड केले. पण त्यांच्या पाठीमागे देखील इतके आमदार कधीही गेले नाही. मग एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे काय? शिवसेनेचे निष्ठावंत आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकटवर्ती आमदार देखील शिंदे यांना पाठिंबा कसे देतात? हे आमदार स्वतःहून जात आहेत की त्यांना शिवसेनेतच कोणी मोठा नेता जाण्याचा सल्ला देत आहे? असा सवाल देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित करीत आहेत.

शिवसेनेत याआधी छगन भुजबळ गणेश नाईक नारायण राणे राज ठाकरे यासारख्या दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त करत बंड पुकारले होते. मात्र त्यांच्या पाठीमागे देखील इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार कोणीच गेले नाही. आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे जात आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दूर सारण्यासाठी हा शिवसेनेने रचलेला मोठा बिग प्लॅन तर नाही अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

Team Global News Marathi: