“हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसलं नाही;” शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

 

मागच्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेनेत वादाची ठिणगी उडाल्याचे पाहायला मिळत आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकरपणे हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका केली जातीये. यातच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आपल्या सभेत राज ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. त्या टीकेला आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

”हल्ली एक मुन्नाभाई भगवी शाल पांघरुन फिरतोय, त्याला आपणच बाळासाहेब आहोत, असं वाटू लागलंय”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता शालिनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शालिनी यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा जोडलेला एक फोटो ट्विट केलाय. या फोटोसोबत लिहीले की, “कधी बाळासाहेब दिसतात, तर भगवी शाल घेऊन फिरतात असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो….फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही…!!!”, अशी टीका शालिनी यांनी केली आहे.

काल मुंबईत शिवसेनेची भव्य सभा झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. “काही दिवसांपूर्वी मला एका शिवसैनिकाचा फोन आला. तो मला विचारत होता, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं, त्याचा काय संबंध? तर तो म्हणाला, त्या चित्रपटात संजय दत्तला सगळीकडे गांधीजी दिसत होते. आपणच गांधीजी झाल्यासारखं त्याला वाटत होतं.

Team Global News Marathi: