आज ठरणार गावाचा नवा सरपंच? थोड्याच वेळात मतमोजणी

 

राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.. 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी होणार असून तुमच्या गावचा सरपंच कोण हे ठरणार आहे. या मतमोजणीसाठी गावोगावी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून गावचे नविन कारभारी आज ठरणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीसाठी 1 हजार 193 उमेदवार सरपंचपदासाठी नशीब आजमावतायत. तर 8 हजार 995 उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात आहेत. तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी प्रक्रिया पार पडत असून साडेआठनंतर निकाल हाती यायला सुरुवात होणार आहे.

तर बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे राज्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायत बीड जिल्ह्यामध्ये होत असल्यानं जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची प्रतिष्ठान लागली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे याबरोबर क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठापना लागलेल्या निवडणुकीत नेमका मतदार कोणाला कौल देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात तब्बल 91 टेबलांवर आज ही मतमोजणी होत आहे.जिल्हा परिषद पंचायत समितीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत कोणत्या पक्षाला मतदारांनी कौल दिला हेही स्पष्ट होणार आहे.

Team Global News Marathi: