कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्का! बामणीत समरजितसिंह घाटगे गटाची बाजी

 

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या गावगाड्यावर आज गुलालाची उधळण होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु झाली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारासच पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतमोजणीस्थळी कडक बंदोबस्त आहे. सीसीटीव्हीचीही नजर असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्या-त्या तालुक्याचे तहसीलदार काम पाहतील. त्यांना एक सहायक अधिकारही असणार आहे.

कोल्हापूर शहराच्या वेशीवरील गावांमध्ये निवडणूक होत असल्याने उत्सुकता आहे. वडणगे, पाचगाव, उचगाव, कळंबा, मोरेवाडी या ग्रामपंचायतींमध्ये थेट महाडिक आणि सतेज पाटील गटात स्पर्धा असल्याने कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पाचगावमध्ये 66 टक्के मतदान झाले. पाचगावमध्ये महाडिक आणि पाटील गटात थेट स्पर्धा आहे. अपक्षांनी सुद्धा मोठी ताकद लावली असल्याने डोकेदुखी कोणाला होणार हे निकालानंतर समजेल.

सरपंचपदासाठी प्रियांका संग्राम पाटील, सुवर्णा भिकाजी गाडगीळ, भारती संतोष ओतारी, मिनाक्षी महेश डोंगरसाने रिंगणात आहेत. या ठिकाणी महाडिक, पाटील गटात चुरस आहे. कंदलगावमध्येही याच दोन गटात सामना आहे. मोरेवाडीतही पाटील व महाडिक गटात चुरस आहे.

Team Global News Marathi: