Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजान सुरू होताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भाषण थांबवलं

by Team Global News Marathi
July 29, 2022
in राजकारण
0
15 जूनला आदित्य ठाकरे शेकडो शिवसैनिकांसह अयोध्यात घेणार रामलल्लाचे दर्शन घेणार!

 

शहानंदे गटाच्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालट झाल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच आता शिवसेनेला एका छताखाली आणण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यभराचा दौरा सुरु केला आहे. आज खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. ८ ऑगस्टपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली. त्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढून ठिकठिकाणी शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत.

मुंबईतल्या चांदिवली भागात आदित्य ठाकरे यांनी निष्ठायात्रा काढत शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्याला प्रचंड गर्दी झाली होती. या मेळाव्यात भाषण करताना मशिदीवरील भोंग्यावर अजान सुरू झाली. आदित्य भाषण करताना हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अजान संपेपर्यंत सभास्थळी शांतता होती. अजान संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली. आदित्य ठाकरेंच्या या कृतीची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे.

काही महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटवावेत या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक आंदोलन हाती घेतले होते. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज यांच्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. अजानला विरोध नाही परंतु भोंग्याला विरोध आहे असं सांगत राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने मशिदीवरील भोंगे हटवावेत अशी मागणी केली. त्याचसोबत आमचं सरकार आल्यास मशिदीवरील भोंगे हटवले जातील असं जाहीर केले होते. राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या या भाषणाचा व्हिडिओही शेअर केला होता. इतकेच नाही औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे भोंग्याच्या प्रश्नी बोलत असताना अचानक अजान सुरू झाली. तेव्हा राज यांनी पोलिसांना विनंती करत ताबडतोब हे थांबवा अन्यथा पुढे काय होईल सांगू शकत नाही असा इशारा दिला होता.

काय सांगता | व्हॉटस अप विकणार मार्क झुकेरबर्ग

“मला काही झाले तर नाना पाटेकर.”, या अभिनेत्रींच्या पोस्टने खळबळ

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
अमरावती जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत बच्चू कडू यांचे पॅनल विजय

शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी सरकारला धोका नाही - बच्चू कडू

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group