आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता

 

सध्या राज्यात पावसानं उघडीप दिला आहे. हवामान विभागानं काल मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज दिला होता. मात्र, पावसानं दांडी मारली आहे. सध्या परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. आजपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागानं सांगितेल आहे. दरम्यान, आजही राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, आमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

Team Global News Marathi: