आज जी महाविकास आघाडी झाली, ती 2009 मध्येच झाली असती

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकारिणीत उपनेतेपद दिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज शिरूरमधील शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला? हे सांगण्यासाठीच आज बैठक घेतल्याचं शिवाजीराव आढळराव यांनी सांगितलं. गेली अडीच वर्षे आपल्यावर अन्याय झाल्याचा घणाघाती आरोपही यावेळी बोलताना आढळराव यांनी केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतील, असंही यावेळी बोलताना आढळरावांनी स्पष्ट केलं.

शिवाजी आढळराव म्हणाले की, “अचानकपणे बातमी आली की, शिवाजी आढळराव हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आणि आता ते शिंदे गटाचे उपनेते असतील. मला फोन सुरू झाले. अनेकांनी अभिनंदन केलं, काहींनी आम्हाला का सांगितलं नाही? असा प्रश्न विचारला. ते सांगण्यासाठी आज बैठक बोलावली. गेली अडीच वर्षे आपल्यावर अन्याय झाले. शिरूर लोकसभेतील तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि अन्य शासकीय अधिकारी भयभीत होते. ते मला रात्री भेटायला यायचे, त्यांच्यावर राष्ट्रवादीचा दबाव होता. ते सांगायचे की, तुम्हाला भेटू नये, म्हणून आम्हाला सांगितलं जातं. एका बाजूला मी आजारी आहे, तरी दुसरीकडे मला मतदारसंघ वाऱ्यावर सोडता आला नाही. का तर ज्यांनी कामं करायची गरज होती. ते मतदारांना उपलब्ध होत नव्हते.”

“2009 साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती. तेव्हा मला संजय राऊत म्हणाले की, शरद पवार शिरूर लोकसभा लढवतील, तुम्ही मावळ लोकसभा लढवा. त्यामुळं उद्धव ठाकरेंची सभा तूर्तास आपण घेणार नाही. आपली युतीची बोलणी सुरू आहेत. मग मी म्हणालो आपलं बोलणं सुरू आहे ना? मग दोन दिवसांनी शरद पवारांची सभा आहे, ती पण रद्द करायला सांगा. ते म्हणाले आता आपण त्यांना कसं काय सांगणार? मग मी म्हणालो, मला का सांगताय, असं म्हणून मी निघून आलो. काही वेळानं फोन आला, उद्धव ठाकरे साहेब येतायेत सभेची तयारी करा. मग त्याचवेळी मला शरद पवारांनी दोन वेळा राज्यसभेवर घेण्याची ऑफर दिली होती. मात्र मी बाळासाहेबांना सांगितलं आणि त्यानंतर युतीचा प्रस्ताव फेटाळला गेला. आधी मावळ, आता पुणे नंतर बारामतीतून लढा म्हणाले असते. आज जी महाविकास आघाडी झाली ती 2009लाच झाली असती.

केंद्रात श्रीकांत शिंदे यांना संधी’? पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना देणार स्पेशल गिफ्ट

 

उद्धव ठाकरेंना धक्का, केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

 

Team Global News Marathi: