आज ईडी चौकशी, तपास यंत्रणांना सहकार्य करणं माझं कर्तव्य, राऊतांचं ट्वीट

 

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना आलेल्या ईडी समन्सनंतर आता ते आज ईडी चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे. काल संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, “बहुदा शुक्रवारी दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार आहे. मी माझी भूमिका स्पष्ट करेल. मला पक्षाच्या कामांपासून रोखण्यासाठी, महाराष्ट्राच्या कामापासून रोखण्यासाठी हे सर्व दबाव सुरु आहेत. या दबावांना बळी पडून आमचे काही लोक पळून गेले असले, तरी मी आजच ईडीसमोर हजर राहीन, कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी त्याला सामोरं जाईल.” , असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आज संजय राऊत ईडीसमोर हजर होणार आहेत.

संजय राऊत यांनी ट्वीट केलंय की, “मी आज दुपारी 12 वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये, असं आवाहन करतो.” राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले असताना दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांची चौकशी सुरू आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीनं 28 जून रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. परंतु, त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. अशातच, संजय राऊत यांना अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ईडीनं मागितलेली सर्व कागदपत्रं सादर करण्यासाठी संजय राऊत यांनी 14 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. ईडीनं ही विनंती स्विकारत संजय राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी 14 दिवसांची मुदतवाढ दिली होती. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं संजय राऊत यांना हे समन्स बजावलं होतं.

Team Global News Marathi: