“देवेंद्र फडणवीस ज्युनिअरच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील हे स्वप्नातही वाटलं नाही”

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे त्यांच्या शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत लोकांना समजत होते. मात्र शपथविधीच्या काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांनाच चकित केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ खडसे यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

यावर अनेक दशके भाजपमध्ये काम केल्यानंतर ज्येष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली. या निवडणुकीत एकनाथ खडसे विजयी झाले. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याची बातमी धडकली आणि राज्यात मोठी खळबळ उडाली. सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद तसेच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या नाट्यमय घडामोडींनंतर आता नवे सरकार स्थापन होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्यापासून ते मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. यातच एकनाथ खडसे यांनीही नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने दोघांना माझ्या शुभेच्छा. मागच्या सरकारपेक्षा अधिक चांगले काम त्यांनी या ठिकाणी करावे. आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता यांनी करावी. घडलेले नाट्य हे अनअपेक्षित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची खूप मोठी अपेक्षा पूर्ण झाले नाही, परिस्थितीनुसार त्यांनी स्वीकारले, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Team Global News Marathi: