अहो सदाभाऊ खोत ! निरोप आला म्हणे.आता विश्रांती घेण्याचा, राष्ट्रवादीचा टोला

 

विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये प्रवीण दरेकरांसह प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांची नावे आहेत. भाजपकडून ही नावे जाहीर केल्यानंतर राज्यात पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपने डावलल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे रविकांत वरपे यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. “एवढी आंदोलनं, आकांडतांडव करून काय उपयोग? तिकीट तर मिळालं नाही ” ! असा टोला त्यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला आहे.

याबाबत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की , ” अहो सदाभाऊ खोत ! निरोप आला म्हणे… आता विश्रांती घेण्याचा.भाजपासाठी विखारी वक्तव्ये केली गरळ ओकली,आक्रोश केला पण तो काही कामी नाही आला वाटतं! भाऊ हे भाजपावाले घासभर खाऊ घालतात आणि कोस भरचालत नेहतात. भाजपा म्हणजे “काम सरो आणि वैद्य मरो” अशा आशयाचे ट्विट रविकांत वर्पे यांनी केले आहे.

मागच्या काही काळापासून सदाभाऊ खोत यांनी अनेक आंदोलनं केली, शिवाय विविध मुद्यांवरून त्यांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीकाही केल्या मात्र एवढे करूनही सदाभाऊंना भाजप कडून विधान परिषदेसाठीच तिकीट मिळाले नाही. यावरूनच राष्ट्रवादी युवकच्या रविकांत वर्पे यांनी सदाभाऊंना खोचक टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: