पायलट ते एक यशस्वी शेतकरी थक्क करणारा असा प्रवास”

गुजरातमधील भुज या ठिकाणी राहणारे ईश्वर पिंडोरिया हे असे एक व्यक्ती आहेत ज्यांना पायलट बनण्याची इच्छा असताना ते एक यशस्वी शेतकरी बनले आहेत.

शेतीची सुरवात करण्याअगोदर त्यांनी इस्राएलमधील अनेक ठिकाणांचा प्रवास केला असून शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास देखील केला आहे.
पायलटसाठी लागणारे सर्व शिक्षण पूर्ण झाले परंतु नशिबाला हे मंजूर नव्हते आणि शेवटी त्यांना त्यांच्या वडिलांचा उद्योग सांभाळावा लागला.आज ईश्वर पिंडोरिया फक्त एक यशस्वी उद्योजक नसून एक उत्तम शेतकरी देखील आहेत.

ईश्वर यांचा प्रवास एवढा सोपा नव्हता त्यात अनेक चढउतार होते परंतु त्यांनी कधी हार मानली नाही.२००६ सालापासून ईश्वर पिंडोरिया ४० एकर जमिनीवर खजूर, डाळिंब व आंब्याची शेती करतात व यासाठी त्यांनी इस्राएलमधील कृषी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

वडील जरी शेती करत नसले तरीही आजोबांची शेतीशी नाळ जोडली गेलेली होती.शेती करण्याअगोदर ईश्वर यांनी ठरवले होते की ते पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करतील.

२००३ मध्ये त्यांनी शेतीसाठी लागणाऱ्या सर्व तंत्रज्ञानाचा अभ्यास करून एक योजना बनवली.
आज ईश्वर यांच्याकडे खजूरच्या विविध जाती असून आंबा व डाळिंब यांच्या देखील विविध जाती आहेत. त्यांनी शेतामध्ये ठिबक सिंचन, कॅनॉपी मॅनेजमेंट, बंच मॅनेजमेंट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट व पेस्ट मॅनेजमेंट यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

त्यांनी कॅलिफोर्नियावरून मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी इन्स्ट्रुमेंट मागवले असून त्याचा ते वापर देखील करतात. त्यांच्या शेतीला जीएपी सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे.फळांचे स्टोरेज लाईफ वाढवण्यासाठी त्यांनी स्वतःचे कोल्ड स्टोरेज देखील उभारले आहे.

ईश्वर पिंडोरिया यांच्या फळांची विक्री देशातील अनेक मोठ्या शहरांत होत असून विदेशात देखील होते. त्यांच्या ब्रँडचे नाव हेमकुंड फार्म असे आहे.
ईश्वर पिंडोरिया यांची फळे रेसिड्यू फ्री असून त्याला इतर देशात भरपूर मागणी आहे. फळांची गुणवत्ता व चव इतर शेतकऱ्यांच्या फळांपेक्षा उत्कृष्ट आहे.
ईश्वर यांच्या केशर जातीच्या आंब्याला देखील चांगला दर मिळतो. इतक्या वर्षात अनेक ग्राहक जोडले गेले असून खजुराला देखील चांगला दर मिळत आहे.

२००६ मध्ये खजूरची लागवड केलेला खजूर २००८ साली फळे देण्यास सुरवात करतो. एका खजूरच्या झाडापासून जवळपास २०० किलो खजूर मिळत असून त्याला दर देखील चांगला मिळत आहे. सामान्य खजूर हा १२-१४ ग्रॅम असतो परंतु ईश्वर पिंडोरिया यांचा खजूर २३-२६ ग्रॅम एवढा आहे.

सध्या खजुराची १०-१२ झाडें घेऊन त्यांचे क्रॉस पॉलीनेशन करून नवीन जात शोधून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

शेतीला खत देण्यासाठी ते गाईचे शेण, घरातील ओला कचरा, शेतातील खजुराची पाने यांचा वापर करतात.
सुरवातीला थोडयाफार चुका होतात परंतु एकदा का जम बसला की मग सर्व व्यवस्थित होते. शेती करण्यासाठी फक्त मेहनतच उपयोगात येत नाही तर त्याला मार्गदर्शनाची जोड असावी लागते असे ईश्वर पिंडोरिया यांचे मत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: